दैठणा: दोन दिवसांपूर्वी दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळगाव शिवारात एका विहिरीत १७ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळले होते. याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी २४ तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावून खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. परभणी शहरातील नेहरु नगरातील आरोपी राहुल ऊर्फ बाळू शेषराव खरात (वय २०) याची सहा महिन्यांपूर्वी बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये मंदा नामदेव धनवे (१७ रा.खाजानगर, परभणी) या तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमामध्ये झाले. पुढे या दोघांमध्ये भेटीगाठी वाढून अनैतिक संबंध जुळले. यामधून मंदा ही गरोदर राहिली. मंदा हिने वारंवार राहुल याकडे लग्नाची मागणी केली. परंतु, राहुल हा लग्नास टाळाटाळ करत होता. मंदा हिने वारंवार लग्नासाठी तगादा लावला. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी मंदा हिला बोलावून घेतले व बाभूळगाव शिवारात दोघे जण आले. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. राहुल याने मंदाच्या डोक्यावर व कपाळावर जबर मारहाण करुन तिचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी दरशथ दाजीबा वाव्हुळे यांच्या शेतातील विहिरीत मंदाचे प्रेत टाकून दिले. दरम्यान, शेतकरी दरशथ वाव्हुळे यांनी आपल्या शेतातील विहिरीमध्ये एका तरुणीचे प्रेत असल्याचे ६ सप्टेंबर रोजी दैठणा पोलिसांना सांगितले. प्रथम या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर तरोणे, बीट जमादार शेषराव जाधव, नारायण लटपटे यांनी तपासाची चक्रे फिरवून परभणी येथील राहुल ऊर्फ बाळू शेषराव खरात यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील घटनेची कबुली दिली. (वार्ताहर) प्रमाणपत्राचे वितरणपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या हुशार गृहअभियंता या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्राचार्या विशाला पटनम्, संचालक डॉ.अशोक ढवन आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.डॉ.हेमांगीनी सरबेंकर यांनी केले. जिमखाना उपाध्यक्षा डॉ.सुनीता काळे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
‘त्या’ प्रकरणी खुनाचा गुन्हा
By admin | Published: September 08, 2014 12:02 AM