शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडले; चार छायाचित्रकारांवर गुन्हे दाखल, ड्रोनही केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 3:14 PM

दौलताबाद किल्ला, हज हाऊस, मकबरा परिसरात चित्रिकरण

छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना आकाशात ड्रोन उडवून चित्रिकरणाची हौस चार छायाचित्रकारांना चांगलीच महागात पडली. पोलिस आयुक्तांचे आदेश भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन ड्रोन जप्त करण्यात आले.

मोहम्मद मुस्तफा शरीफ (२९, रा. औरंगपुरा), मोहम्मद मोईनोद्दीन मोहम्मद इरफान (१८, रा. यशोधरा कॉलनी), शेख मुद्दसीर शेख रज्जाक व खान रेहान इरफान (२५, रा. कैसर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. चौघांवर बीएनएस ड्रोन अधिनियम २०२१, वायुमान अधिनियम १९३४ कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यातील रेहानने दौलताबाद किल्ला व हज हाऊस परिसरात ड्रोन उडवून चित्रिकरण केले. मुस्तफाने बीबी का मकबरा व सोनेरी महल, तर मोईनोद्दीनने बीबी का मकबरा परिसरात ड्रोन उडवून चित्रिकरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या सूचनेवरुन निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक कदीर देशमुख, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, अंमलदार राहुल काळे, अल्ताफ पठाण यांनी ही कारवाई केली.

ड्रोनची नोंदणी केली का ?काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील ड्रोन चालक, प्री वेडिंग व्यावसायिक, शुटिंग व्यावसायिक छायाचित्रकारांची बैठक घेऊन येलो झोन, रेड झोन भागात नियमानुसार ड्रोनचे रजिस्ट्रेशन करणे, ड्रोन उडवण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची पूर्वपरवानगी घेण्याची सूचना केली होती. शहरातील काही भाग हा ड्रोन प्रतिबंधात्मक क्षेत्रात आहे. अतीमहत्वाचे ठिकाणे, पर्यटन स्थळ, प्रेक्षणीय स्थळावर ड्रोन उडवण्यास मनाई आहे. शिवाय, २३ ऑगस्ट रोजी त्यांनी विनापरवाना ड्रोन उडवण्यास बंदी आदेश जारी केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद