वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी व शेकापूर शिवारात अनधिकृतपणे भुखंडांची खरेदी-विक्री व बांधकामप्रकरणी सिडको प्रशासनाच्या तक्रारीवरुन १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्यांची फसवणूक करणारे लोक भूमिगत झाले आहेत.
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वडगाव कोल्हाटी व शेकापूर येथे अनेकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. यावर अनधिकृत प्लॉटींग बोगस गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे रजिस्ट्री करुन अनेकांना भुखंडाची विक्री केली आहे. या भुखंडाच्या रजिस्ट्री होत असल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दफ्तरीही भुखंडाच्या नोंदी घेतल्या जात असल्याने अनेकजण या आमिषाला बळी पडून या भागात घरे व भूखंड खरेदी केले आहेत
. या अनधिकृत भुखंडाच्या खरेदी-विक्रीतून तीन-चार वर्षात अनेकांने चांगलीच कमाई केली आहे. दरम्यान, सिडकोच्या अधिकाºयांनी वडगाव कोल्हाटी व शेकापुरात अनधिकृत बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या होत्या. या पाहणीत काहीजण अनधिकृतपणे भुखंडाची खरेदी-विक्री व घराची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश अनधिकृत प्लॉटींग वडगाव व शरणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सिडको प्रशासनाने संबंधितां विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
यांच्याविरुद्ध गुन्हे दाखलवडगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाºया गट क्रमांक ५,७, १०/१, १०/२,११, १२ तसेच शरणापूरमधील गट क्रमांक ६ मध्ये अनधिकृत रेखाकंन व बांधकाम करुन नागरिकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांनी तक्रारी दिली. यावरुन एस.के.पाटील, ए.के.ताजणे, सुभाष औताडे, बाबासाहेब साळुंके पाटील, विकी पारसवाणी, कृष्णा रावसाहेब पवार, गोविंद रामलिंग सोलपुरे, किशोर भिमराव म्हस्के, विजय एकनाथ साळे, मोहम्मद एकबाल मोहम्मद रमजान, कर्नल आशुतोष जोशी, सुभेदारबॅनर्जी, सुभेदार मेजर बलविंदरििसंग, सुभेदार गोविंदा, डॉ.चंद्रशेखर पाठक,शंकर गणपतराव सोनवणे, संदीप महापुरे आदींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.