जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून खून, हाणामारी, चोर्या, लूटमार, बलात्कार, विनयभंग, जातीय तणाव यासारख्या घटना दररोज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नानेगाव (ता. बदनापूर) येथील सरपंचाचा खुनाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. त्यापाठोपाठ वालसावंगीतील अल्पवयीन मुलींची हत्या, परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील ग्रामस्थांवरील अन्याय, घनसावंगीतील कंडारी काकडी येथील ध्वजप्रकरण तसेच जाफराबाद तालुक्यातील वरूड येथील जातीय तणाव प्रकरण इत्यादी घटनांमुळे जिल्ह्यात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरातील साळी गल्लीतील खून प्रकरण, शनिमंदिर चौकात भरदिवसा कोयता हातात घेऊन युवकाने दहशत निर्माण केलेला प्रयत्न, याच परिसरात २७ रोजी रात्री चार जणांनी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शहरात सकलेचानगर भागात एका व्यापार्याची दीड लाखांची बॅग लंपास, इन्कमटॅक्स कॉलनीत भरदिवसा झालेली सव्वा लाखांची चोरी, जुना जालना आनंदवाडी परिसरातील चोरी तसेच काही व्यापार्यांची दुकाने फोडण्याचे प्रकार यासारख्या घटनांमुळे सर्वसामान्य व व्यापार्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग ह्या रजेवर आहेत. पोलिस यंत्रणेचा वचक न राहिल्याने अशा घटना वाढत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) काद्राबाद भाजीमंडई भागातील एक महिला किराणा दुकान चालवते. या महिलेला दोन मुली आहेत. एका मुलीवर प्रेम जडल्याची सांगत थेट घरात प्रवेश करणार्या आरोपीविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या महिलेने महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे १५ दिवसानंतर पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले. मात्र पोलिस यंत्रणेत त्याची अंमलबजावी होत नाही, हे जालन्यातील उदाहरणारून स्पष्ट होते. वालसावंगी प्रकरणात तपासात गती भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे दोन चिमुकल्या मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा पोलिस यंत्रणेसह औरंगाबाद परिक्षेत्रातील यंत्रणेनेही तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यश मिळविले.सदरील घटनेनंतर पोलिस अधिकारी, कर्मचार्यांचा मोठा फौजफाटा दोन दिवस गावातच तळ ठोकून होता.
गुन्हेगारीने डोके वर काढले
By admin | Published: May 29, 2014 12:02 AM