शहरं
Join us  
Trending Stories
1
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
2
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
3
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
4
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
5
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
6
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
7
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
8
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
9
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
10
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
11
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
12
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
13
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
14
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
15
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
16
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
17
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
18
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
19
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
20
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन

शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार

By सुमेध उघडे | Published: February 27, 2020 7:32 PM

राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये

ठळक मुद्देशहरातील नागरिकांनी नोंदवली परखडपणे मते प्रत्येक उमेदवाराचा गुन्हेविषयक तपशील जाहीर करावा

- सुमेध उघडे

औरंगाबाद : राजकारणातील गुन्हेगारी संपावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. शहर शांत राहण्यासाठी तसेच विकासात्मक कामे मार्गी लागण्यासाठी शहरातील आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार आम्ही नाकारू, असे स्पष्ट मत शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ सर्वेक्षणातून मांडले आहे. 

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदान केंद्राबाहेर फलकावर ठळकपणे लावण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम वाखाणला गेला होता. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील स्वत:ची वेबसाईट, एक स्थानिक व एक राष्ट्रीय वृत्तपत्र, तसेच फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांतून प्रसिद्ध करावा, असे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १८ ते ३० वर्षे या वयोगटातील ६० टक्के, ३१ ते ४५ वयोगटाचे ३० टक्के आणि ४६ वयापेक्षा अधिकच्या १० टक्के उत्तरदात्यांचा समावेश होता.  

राजकारणातील गुन्हेगारी संपावी या सर्वोच्च न्यायालयाच्या मतास १०० टक्के उत्तरदात्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर राजकीय पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट का देतात? यावर ८० टक्के उत्तरदात्यांनी असे लोक पक्षाला पैसा पुरवतात, असे परखड मत नोंदवले, तर १० टक्के उत्तरदात्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच राजकीय पक्ष चालवत असल्याचे वाटते, तसेच १० टक्के उत्तरदात्यांच्या मते लोकच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देतात, असे खोचक मत नोंदवले आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांवरील गुन्ह्याचा तपशील जाहीर करावा का? या प्रश्नाससुद्धा १००% उत्तरदात्यांनी पाठिंबा दर्शवला असून, प्रत्येक उमेदवाराचा गुन्हेविषयक तपशील राजकीय पक्षांनी जाहीर करावा, असे म्हटले आहे. 

राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये यासोबतच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाच्या उत्तरात १००% उत्तरदात्यांनी अशा उमेदवारांना राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये, असे म्हटले आहे, तसेच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार दिले, तर तुम्ही नाकारणार का? या प्रश्नावर १००% उत्तरदात्यांनी आम्ही आगामी निवडणुकीत अशा उमेदवारांना नाकारणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीVotingमतदान