छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर येणाऱ्या काळात दुष्काळाचे संकट घोगावू लागले आहे. जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला असून ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसानेदेखील दोन दिवसांपासून काढता पाय घेतला आहे. पाच दिवसांत थोडाच पाऊस पडला. ६ सप्टेंबरला सायंकाळी पावसाचे पुनरागमन झाले. ११ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारली आहे. पाच दिवसांत ५० मि.मी.पाऊस बरसला.
जूनपासून किती पाऊस?मराठवाड्यात जून महिन्यापासून आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. २२२ मि.मी.पावसाची तूट असून पावसाळा संपण्यासाठी १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.
औरंगाबाद : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २७सरासरी : ५८१ मि.मी. तूट : २१९ मि.मी.
जालना: एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २८सरासरी : ६०३ मि.मी. तूट : २३५ मि.मी.
बीड : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : १८सरासरी : ५६६ मि.मी. तूट : २५७ मि.मी.
लातूर : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २२सरासरी : ७०६ मि.मी. तूट : २९६ मि.मी.
उस्मानाबाद: एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : १९सरासरी : ६०३ मि.मी. तूट : २६० मि.मी.
नांदेड : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : ३४सरासरी : ८१४ मि.मी. तूट : ३३ मि.मी.
परभणी : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस :२५सरासरी : ७६१ मि.मी. तूट : ३६९ मि.मी.
हिंगोली : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : ३१सरासरी : ७९५ मि.मी. तूट : २१२ मि.मी.
तुम्हीच सांगा कसे जगायचे?टोमॅटोचे बाजारपेठेत दर कोसळल्याने ऐन दुष्काळाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडले आहेत. जे पिकले त्याला भाव नाही. दुसरीकडे पावसाअभावी खरीप पिके वाळून गेली आहेत. लाडसावंगी भागात यंदा काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली. मागील महिन्यात टरबुजाला पस्तीस ते चाळीस रुपये किलोचा दर होता. परंतु गेल्या आठवड्यात बारा ते अठरा रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्याने शेतकरी आहेत. दुष्काळाचे संकट, आहे त्या मालाला भाव नाही. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगावे, असा प्रश्न आहे.
प्रमुख पिके कोणती?प्रमुख पिके : कापूस, मका, सोयाबीनएकूण लागवड क्षेत्र : ४० लाख हेक्टर
मोठ्या धरणातील पाणीसाठाप्रकल्प..........२०२२.......२०२३जायकवाडी.... ९६ टक्के....३४ टक्केनिम्म दुधना.....७५ टक्के.....२५ टक्केयेलदरी........१०० टक्के......६१ टक्केसिध्देश्वर....१०० टक्के.......५५ टक्केमाजलगाव....७२ टक्के......१२ टक्केमांजरा.....४४ टक्के.......२४ टक्केपेनगंगा....९७ टक्के.......७० टक्केमानार....१०० टक्के.......५७ टक्केनिम्न तेरणा.....९६ टक्के......२५ टक्केविष्णूपुरी......७९ टक्के......८६ टक्केसिना कोळेगाव....५१ टक्के....०० टक्केएकूण........९२ टक्के.........४४ टक्के