सोयगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी कृषी विभागाच्या आढाव्यावरून दिली. मात्र, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानीचा मावेजा मिळणार असून, यासाठी एनडीआरएफचा निकष लावण्यात आलेला आहे. या निकषात कोरडवाहू क्षेत्रासाठी सहा हजार आठशे हेक्टरी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी बारा हजार पाचशे याप्रमाणे क्षेत्रनिहाय याद्या करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी हाती घेतले आहे. अतिवृष्टीत शेतजमीन वाहून गेलेल्या क्षेत्राला हेक्टरी ३७ हजार पाचशे याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली असल्याने सोयगाव तालुक्यात कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रनिहाय याद्या करण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची मोठी प्रतीक्षा लागून आहे.
चौकट
पंचनाम्यांच्या बाधित क्षेत्राची जुळवाजुळव
अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीत करण्यात आलेल्या बाधित क्षेत्राची जुळवाजुळव महसूल आणि कृषीच्या पथकांनी हाती घेतली आहे. काही भागात अद्यापही पंचनामे सुरू असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे पंचनामे आणि बाधित क्षेत्राची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना तहसीलदार रमेश जसवंत यांनी शुक्रवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
170921\aur15soyp06.jpg
सोयगाव-सोयगाव तालुक्यात अतिवतुष्टी चा फटका