सिल्लोड : सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल २ हजारांच्यावर नावावर भाजप, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, आप, विविध पक्षाच्या पदाधिकारी व मतदारांनी आक्षेप घेतले. यात काही मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.आम्ही ज्या प्रभागात मध्ये राहतो त्याच प्रभागात आमची नावे समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी मतदारांनी पुराव्यानिशी शनिवारी आक्षेप घेण्याच्या शेवटच्या दिवशी केली. यामुळे ज्या प्रभागात तो राहतच नाही त्या प्रभागात त्यांची नावे आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रूवारी आहे. या सर्वच पक्षाचे पुढारी शनिवारी सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयात आक्षेप घेण्यासाठी ठाण मांडून उभे होते. दोन दिवसात यादीचे निरसन करण्याचे जोखमीचे काम आता प्रशासनाला करावे लागणार आहे. महसूल विभागाचे अव्वल कारकून बी. एस. बरडे यांनी आक्षेप स्वीकारले. त्यांना लिपिक आर. एस. जाधव, आॅपरेटर रोहित राजपूत, कोतवाल विष्णू काटकर, डी. ए. इंगले, पी. ए. खंदारे, एस. जे. करंगले, संजय मोकासे, योगेश वासनिक, एन.आर. पिद्दी, संतोष परदेशी यांनी सहकार्य केले.मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीसिल्लोड येथील नगर परिषदचे मुख्याधिकारी सय्यद रफीक यांनी राजकीय दबावामुळे प्रारूप मतदार यादी ३१जानेवारी रोजी ५ वाजेच्या आत प्रसिद्ध केली नाही व मतदारयादीत घोळ केला. पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विनोद मंडलेचा यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली.खुलासा मागितलाकरण्यात आलेल्या आरोपाबाबत मुख्याधिकारी सय्यद रफीक यांना स्वयंस्पष्ट खुलासा मागितला आहे. खुलासा आल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.
सिल्लोड न.प.च्या निवडणूक प्रारूप मतदारयादीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:49 PM