तालुक्यात कापूस पिकांसाठी ६,३४८ हेक्टर क्षेत्रातील ८,२४९ शेतकऱ्यांना ६ कोटी ७८ लाखांचे विमा मंजूर केला आहे. तूर पिकांसाठी २४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७४९ शेतकऱ्यांना ९ लाख ९४ हजार ८८६ रुपये मंजूर झाले आहेत. कापूस व तूर या दोन्ही पिकांसाठी संपूर्ण तालुक्यातील ८,९९८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
चौकट
मका, सोयाबीनला वगळले
१) तालुक्यात खरिपाच्या कपाशीपाठोपाठ मका पिकांचाही विक्रमी पेरा लागवड करण्यात आला होता, परंतु कंपन्यांनी तालुक्यातील मका व सोयाबीनला पीकविम्यातून वगळले आहे. या दोन्ही पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
२) तालुक्यातील अंतिम आणेवारी ४७ टक्के असतानाही टंचाईग्रस्त परिस्थितीत सोयगावचा समावेश करण्यात आलेला नाही. अतिवृष्टी, वादळी वाऱ्याने मोठे नुकसान असूनही कंपन्यांनी या दोन पिकांना पीकविम्यातून वगळल्याने शेतकरी खरिपाच्या हंगामात संकटात सापडला आहे.