लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पीकविमा भरण्यासाठी रविवारी दिवसभर शेतकºयांची प्रचंड धावपळ पहायला मिळाली. सीएससी सेंटरची ‘क्रॉप इन्शुरन्स वेबसाईट’ डाऊन असल्याने केंद्रासमोर शेतकºयांच्या रांगा पाहायला मिळाल्या. जामखेड येथे पोलिसांना शेतकºयांवर लाठीमार करावा लागला.जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने बहुतांश भागातील पिकांची वाढ खुंटली आहे. पिके वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी पीकविमा भरण्यासाठी बँकाकडे धाव घेत आहेत. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून पीकविमा आॅनलाईन भरण्यात येत आहे.शेतकºयांच्या तुलनेत जिल्ह्यात या केंद्रांची संख्या कमी आहे. आतापर्यंत केवळ २० हजारांपर्यंत शेतकºयांचे विमा अर्ज आॅनलाइन भरले आहेत. विमा भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्वच शाखांसमोर शेतकºयांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत गर्दी वाढल्यान पोलीस बंदोबस्तात विमा स्वीकारण्यात आला.छत्रपती शिवाजी व्यापार संकुलासह नवीन मोंढ्यातील शांखांमध्येही शेतकरी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.केदारखेडा येथे बँकेच्या कर्मचाºयांच्या मर्जीतील काही शेतकºयांच्या संचिका बँकेच्या कर्मचाºयांनी मागच्या दाराने स्वीकारल्याने रांगेतील शेतकºयांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.तर जाफराबाद येथे ई-महासेवा केंद्रावरून काढलेला सातबारा महत्त्वाचा की तलाठ्याने दिलेला सातबारा महत्त्वाचा; यावरून शेतकरी संभ्रमात आहेत. मुदत वाढविण्याची मागणी सगळीकडून होत असताना त्याबाबत शासनातर्फे अद्याप कोणीही तसे आश्वासन दिलेले नाही.
‘क्रॉप इन्शुरन्स डाऊन’, शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:04 AM