औरंगाबाद : मराठवाड्यात चालू वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे चार कोटी रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.
विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या मदतीसाठी १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जिरायत पिके घेतलेल्या एक हजार ८२ शेतकऱ्यांचे ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हा शेतकरी अपेक्षित मदत
औरंगाबाद ६०९७ ३ कोटी ४५ लाख
जालना ६२८ ११ लाख ८८ हजार
बीड ६९८ २३ लाख ६० हजार
उस्मानाबाद १०४ १४ लाख १५ हजार
एकूण ७५२७ ३ कोटी ९५ लाख