शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मोलकरणींच्या नोंदणीसाठी गर्दी

By admin | Published: August 27, 2014 1:12 AM

जालना : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मोलकरीण व बांधकाम मजुरांची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी

जालना : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मोलकरीण व बांधकाम मजुरांची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस संरक्षण घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. सोमवारी तर पोलिस संरक्षण घेऊन कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. मंगळवारी खाजगी सुरक्षा रक्षक नेमून कामकाज करावे लागले. यात बोगस कामगार व मजुरांचा भरणा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी मोलकरणीसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांमध्ये काही जणांची नोंदणी बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा पार बोजवारा होण्याची भिती निर्माण झाली आहे. शहरी भागात कामासाठी मजुर मिळत नाही. मात्र नोंदणीसाठी एकाचवेळी सुमारे दोन ते तीन हजार मजूर हजर झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. ठेकेदारांकडे अधिकृत नोंदणी परवाना नसतानाही लोकांकडून केवळ ठसा मारून सही देण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रकार होत असल्याच्याही तक्रारी आहेत. आयटक कामगार संघटनेचे देवीदास जिगे यांनी सांगितले, आपण गेल्या सहा वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र ऐनवेळी बोगस मजुरांची संख्या वाढल्याने मूळ व गरजू लाभार्थी वंचित राहत आहेत. त्यासाठी शासनाने बोगस लाभार्थींची चौकशी करून मगच नोंदणी करावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)