- विजय सरवदे
औरंगाबाद : कोण म्हणतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University ) गुणवत्ता नाही. ‘तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी’ अशी मराठवाड्यातील पालकांची गत झाली आहे. नुकतेच जागतिक पातळीवरील ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२१’ने जाहीर केलेल्या शास्त्रज्ञांच्या अद्ययावत क्रमवारीत या विद्यापीठातील तब्बल २४ प्राध्यापकांचा समावेश (24 professors of 'Dr.BAMU' in the ranking of world scientists) झाला असून यातील ४ प्राध्यापक हे तर जगातील ‘टॉप- २’ शास्त्रज्ञांमध्ये अव्वल ( 4 professors are in top-2 list of world scientists from Dr. BAMU ) ठरले आहेत. ही घटना मराठवाड्याच्या शिरपेचात तुरा खोवणारी आहे.
जागतिक क्रमवारीत टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. के.एम. जाधव, गणित विभागाचे प्रा. डॉ. कीर्तीवंत घडले, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. भास्कर साठे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम.डी. शिरसाठ या प्राध्यापकांची गनणा झाली असून यांच्यासह २४ प्राध्यापक नुकतेच जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत अव्वल ठरले आहेत. यात डॉ. के.व्ही. काळे, डॉ. रमेश मंझा, डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. बाबासाहेब डोळे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. प्रशांत खरात, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. सुनील पाटील, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. ज्ञानोबा धायगुडे, डॉ. गजानन खिस्ते, डॉ. सुनील शंकरवार, डॉ, बी. के. साखळे, डॉ. सी. नम्रता महेंदर, डॉ. विशाखा खापर्डे, डॉ. दीपक पाचपट्टे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. अहमद हमौदडी आणि डॉ. फैयाज शेख आदींचा समावेश आहे.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे प्रा. मुरत आल्पर व प्रा. सिहान डॉजर यांनी संयुक्तपणे अर्थात ‘ए-डी सायंटिफिक इंडेक्स’चे विश्लेषण केले. त्यासाठी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा मागील पाच वर्षांचा ‘एच- इंडेक्स व आय- टेन इंडेक्स’ या निर्देशकांचे तसेच या संशोधकांच्या संशोधनाचे जगभरातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी संशोधनासाठी घेतलेल्या संदर्भाच्या (सायटेशन) स्कोअरचे विश्लेषण केले. यासाठी त्यांनी जगभरातील १३ हजार ५४२ शैक्षणिक संस्थांमधील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांचा डेटा संकलित केला होता.
प्राध्यापकांचे नाव - जगभरात घेतलेल्या संदर्भाची संख्या- डॉ. के. एम. जाधव - ७२२४- डॉ. एम. डी. शिरसाठ- ३७०२- डॉ. भास्कर साठे - २४३१- डॉ. बाबासाहेब डोळे- १९८६- डॉ. कीर्तीवंत घडले- ११६१- डॉ. रमेश मंझा- १२६०- डॉ. डी. के. गायकवाड- १२४७- डॉ. रत्नदीप देशमुख- १०२१- डॉ. प्रवीण वक्ते- १०१७