शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 7:43 PM

भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : जायकवाडी धरणावरीलभूकंपमापक यंत्र २०१७ पासून बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ लाखांच्या आतील खर्चासाठी जलसंपदा विभागाने हात आखडता घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील २३ महिन्यांत यंत्रदुरुस्तीची संचिका पुढे सरकणे म्हणजे संवेदनशून्यतेचा कळस म्हणावा लागेल.

२१ जुलै २०२० रोजी खुलताबाद तालुक्यात भूगर्भातून मोठा आवाज होत धक्के बसल्याचे जाणवले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२२ रोजी कन्नड तालुक्यातील काही भागांत भूगर्भातून आवाज आला. तालुक्यातील बहुतांश गावांत भूकंपसदृश धक्के बसले. त्या धक्क्यांची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्रावर होईल, असे अभिप्रेत होते, परंतु तेथील अभियांत्रिकी विभागाशी संपर्क केला असता धक्कादायक माहिती समोर आली, भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे. ते यंत्र पुरविणारी कंपनी बंद पडल्याने मेरी (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)कडे प्रस्ताव पाठवूनही पुढे काहीही झालेले नाही. जायकवाडी अभियांत्रिकी विभागाकडे यंत्रच नसल्याने कन्नड तालुक्यातील भूगर्भातील हालचालींची तेथे नोंदच झाली नाही.

प्रस्तावांवर प्रस्तावनाशिक येथील धरण सुरक्षा कार्यालयाकडे २७ डिसेंबर २०१९ रोजी भूकंपमापक यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर त्यांनी एका अभियंत्यामार्फत स्थळपाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी अमेरिकन कंपनीचे डिजिटल यंत्र बसविण्याची सूचना केली. त्यालादेखील संमती दर्शविण्यात आली. जायकवाडी धरणावरील यंत्र अपडेट असणे गरजेचे असल्यामुळे यावर्षीही पथकाने पाहणी केली. अमेरिकन तंत्रज्ञानाचे यंत्र घेण्यासाठी १३ ते १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण संबंधित खाते पाऊल उचलण्यास तयार नाही.

भूगर्भातील पाण्यामुळे ते धक्केआशिया खंडात कुठेही भूकंप झाला तरी त्याची नोंद नांदेड आणि हैदराबाद येथे होते. नांदेड येथील यंत्रावर काही नोंद झाली नाही. हैदराबाद येथील एनजीआरआयकडे या धक्क्याबाबत नोंद नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील धक्के भूगर्भातील पाणीपातळीचे असतील, असा दावा चौधरी यांनी केला.

यंत्र सध्या काम करीत नाहीजायकवाडीतील यंत्र दुरुस्तीसाठी नेलेले आहे. ५ जानेवारी रोजी पथक आले होते. त्यांनी स्थळपाहणी केली. नवीन यंत्रे आणून ते तपासणी करतील, येथील यंत्रे सध्या काम करीत नाहीत.-विजय काकडे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी

टॅग्स :EarthquakeभूकंपAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण