शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
3
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
4
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
5
Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
6
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
7
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
8
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
9
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
10
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
11
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
12
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
13
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
14
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
15
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
16
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
17
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
18
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
19
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
20
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

शेवग्याच्या शेतीत आंतरपिक म्हणून गांजाची लागवड; शेतकऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 8:03 PM

शेखपूर शिवारात  शेतात लावलेला २१ लाख १८ हजारांचा गांजा पकडला

सिल्लोड: तालुक्यातील शेखपूर येथ शेवगा, वाल, एरंडी, व कापूस पिकात आंतरपिक म्हणून गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले. अप्परपोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी येथे छापा मारून २१ लाख १८ हजार रुपये किंमतीचा तब्बल ३५३.५२ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

शेतकरी ज्ञानेश्वर नामदेव काजळे ( ४०, वर्ष रा. शेखपूर ता. सिल्लोड ) याचे शेखपूर शिवारात शेती आहे. येथे गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण सुनील लांजेवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सशाने, सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस हवालदार मोरे, शिंदे, किशोर राजपूत, सूरज जोनवाल यांच्यासह सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सचिन क्षीरसागर, जमादार अनंत जोशी, यतीन कुलकर्णी, विष्णू कोल्हे, पोलीस शिपाई ज्ञानदेव ढाकणे, नागलोद यांनी गुरुवारी ( दि. ३१ ) सायंकाळी छापा मारला.

यावेळी पोलिसांनी २१ लाख १८ हजार रुपयांचा ३५३.५२ किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक घोडे  करत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद