चिंचोली लिंबाजी येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील २५-३० खेड्यांतील नागरिक येथे खरेदीसाठी नियमित येत असतात. यामुळे येथे कायम मोठी गर्दी होते. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या संचारबंदीतही येथे नागरिकांची गर्दी होत असताना दिसत आहे. अनेक दुकानेही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खुलेआम व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाच्या साखळी कशी ब्रेक होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य सेवा वगळता किराणा सामान, भाजीपाला, कृषी सेवा, पेट्रोल पंप यांना सकाळी ७ ते दुपारी १ कालावधीपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. इतर व्यावसायिकांवर मात्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पिशोर पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नियम मोडून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई केली तरच गर्दीला आळा बसेल अन्यथा चिंचोली लिंबाजीसह परिसरात कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आजपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. यापुढे आता किराणा, फळे, भाजीपाला विक्रेते यांची वेळ आता सकाळी ७ ते ११ अशी निश्चित करण्यात आली आहे.
फोटो : चिंचोली लिंबाजीत नियमांचे पालन न करता दुकानांसमोर अशी गर्दी होताना दिसत आहे.
200421\20210419_121136_1.jpg
चिंचोली लिंबाजीत नियमांचे पालन न करता नागरिक असे बिनधास्त वावरताना दिसत आहे.