शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:43 AM

औरंगाबाद : समर्थनगर येथील शिवसेना-भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या पडद्यावर निकाल पाहण्यात मग्न कार्यकर्ते... मतमोजणीच्या आकडेवारीवरून सकाळपासूनच प्रत्येक ...

ठळक मुद्देमहायुतीचे प्रचार कार्यालय : कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल मात्र, पराभवाने तरळले अश्रू

औरंगाबाद : समर्थनगर येथील शिवसेना-भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या पडद्यावर निकाल पाहण्यात मग्न कार्यकर्ते... मतमोजणीच्या आकडेवारीवरून सकाळपासूनच प्रत्येक कार्यकर्ता चिंतेत...मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साहेबांनी आघाडी घेतल्याची माहिती येते अन् एकच जल्लोष होतो... आनंदाने कार्यकर्ते गुलालही उधळतात... परंतु हा आनंद क्षणभंगुर ठरतो... साहेब पिछाडीवर असल्याची माहिती येते अन् कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चिंता पसरते... निकाल स्पष्ट होताच कार्यकर्ते जड पावलांनी कार्यालयातून बाहेर पडतात... असे चित्र महायुतीच्या कार्यालयात दिसून आले.महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी होण्याचा विश्वास होता. परंतु मतमोजणीची एक-एक फेरी संपत होती, तशी कार्यकर्त्यांची घालमेल होत होती. मतमोजणीच्या २२ व्या फेरीपर्यंत नेमके काय होईल, याचा विचार प्रत्येक जण करीत होता. महायुतीचे पदाधिकारीही अगदी शांतपणे बसून होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर एकच जल्लोष अन् जयघोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी आनंदाने गुलालही उधळला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल आणि कार्यकर्ते जयघोष करीत कार्यालयातून बाहेर पडले. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व जण पुन्हा प्रचार कार्यालयात दाखल होतात. महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रत्येक जण बोलून दाखवत होता. परंतु त्यानंतर एक-एक फेरी होत गेली आणि कार्यकर्त्यांमधील आनंद विरून गेला. अटीतटीच्या लढतीत पराजय जवळ दिसू लागल्याने अनेक कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर पडले. अनेक कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी कार्यालयात उभे होते. रात्री आठ वाजता चंद्रकांत खैरे हे प्रचार कार्यालयात दाखल झाले. यावेळी आ. संजय शिरसाट, अतुल सावे, नंदकुमार घोडेले आदींसह पदाधिकारी होते. यावेळी खैरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोणकोणत्या भागातून कसे मतदान झाले, मतमोजणीची प्रक्रिया आणि तेथे झालेल्या प्रकारांविषयी खैरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली.पोलिसांचा चोख बंदोबस्तमहायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून घोषणा देत युवकांची ये-जा होत होती. वारंवार होणाºया या प्रकाराने रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास संतप्त झालेल्या प्रचार कार्यालयातील कार्यकर्ते धावत रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल