शहरं
Join us  
Trending Stories
1
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
2
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
3
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
4
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
5
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
6
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
7
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
8
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
9
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
10
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
11
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
12
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
13
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
14
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
15
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
16
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
17
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
18
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका
19
ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे
20
दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं; कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

करंसी घोटाळा: २९ तरुणांच्या खात्यात थेट विदेशातून फंडिंग, देशविरोधी कृत्यासाठी वापर

By सुमित डोळे | Published: September 13, 2024 8:02 PM

फॉरेन कनेक्शनमुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढणार, शहरातील २९ तरुणांची नावे निष्पन्न

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांच्या नावे बँक खाते उघडून कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारात थेट विदेशातून फंडिंग होत होती. यात प्रामुख्याने दोन देशांची नावे निष्पन्न झाली असून, विदेशी नेटवर्कमुळे मात्र यंत्रणा अवाक् झाल्या आहेत.

बुधवारी गुप्तचर यंत्रणा, शहर पोलिसांनी नॅशनल करंसीचे रॅकेट उघडकीस आणले. सुरतचा उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (वय २३, रा. सुरत, गुजरात) हा शहरातील ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) यांच्या मदतीने तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमिशन देऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन खाते उघडते होते. यासाठी उत्सवकुमारला ऋषिकेश, अनुराग मदत करत होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दोघांना उत्सवकुमारने रॅकेटशी संबंधित एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी केले होते. त्यामुळे दोघेही अल्पावधीत रॅकेटचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याची दाट शक्यता अधिकाऱ्यांना आहे.

मराठवाडा उत्सवकुमारकडेमूळ सुरतचा असलेला उत्सवकुमार महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. सहा महिन्यांपासून तो शहरातील काही तरुणांच्या संपर्कात आहे. त्यापूर्वी तो अन्य मुलांकडून काम करवून घेत होता. त्या तरुणांचाही तपास पथक शोध घेत आहे. खातेधारकाला ७ हजार, तर अनुराग व ऋषिकेशला थेट टक्केवारीवर पैसे मिळत हाेते. या रॅकेटसाठी शहरासह संपूर्ण मराठवाड्यातील नेटवर्कची जबाबदारीच मुख्य सूत्रधारांनी उत्सवकुमारकडे दिली होती. गुरुवारपर्यंत शहरातील किमान ३० मुलांची नावे निष्पन्न झाली होती. त्यापैकी दोघांची गुरुवारी रात्रीच कसून चौकशी करून नोटीस बजावून सोडण्यात आले.

बंद खात्यांच्या तपासाचे आव्हानशहरातील तरुणांचे बँक खात्यांचे पासबुक, एटीएम, डेबिट कार्ड उत्सवकुमार गुजरातला घेऊन जात होता. त्याआधारे कोट्यवधींचे व्यवहार होत होते. ओटीपीसाठी ते त्यांच्याकडील मोबाइल क्रमांक जोडत होते. चार ते पाच व्यवहारानंतर ते खाते बंद करायचे. अशा बंद झालेल्या शेकडो खात्यांचा तपास करणे तपास यंत्रणेला आव्हान आहे. त्या खात्यांमधून मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेला आहे.

विदेशांतून फंडिंगया संपूर्ण रॅकेटला विदेशातून फंडिंग होत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहे. विदेशी संबंधामुळे गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बेनामी व्यवहारांपेक्षा देशविरोधी कृत्यांसाठीच हे रॅकेट सुरू असल्यावर तपास यंत्रणा ठाम आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी