शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

करंसी घोटाळा; रॅकेटमध्ये सहभागी २० पेक्षा अधिक तरुण छत्रपती संभाजीनगरातून फरार

By सुमित डोळे | Published: September 14, 2024 12:52 PM

२०० पेक्षा अधिक खाते उघडणाऱ्याला पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक, १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : शेकडो बँक खाते उघडून त्याचा बेनामी व्यवहारासाठी वापर करणाऱ्या रॅकेटमध्ये शहरातील महाविद्यालयीन सुशिक्षित तरुण अडकले. दोन दिवसांपूर्वी रॅकेट उघडकीस येताच यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शहरातील २० पेक्षा अधिक तरुणांनी तपास यंत्रणेच्या भीतीने शहर सोडल्याचे समोर येत आहे. यापैकी पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ज्ञानेश्वर परमेश्वर पठाडे (२४, रा. बीडकिन) याला पोलिसांनी अटक केली.

दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बँक खात्यांमधील बेनामी व्यवहाराच्या घोटाळ्याने मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आत्तापर्यंत यात सुरतचा उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (वय २३, रा. सुरत, गुजरात) हा शहरातील ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) हे अटकेत आहेत. तिघांच्या मोबाइल, लॅपटॉप तपासत आहे. त्यातून ऋषिकेश सोबत टेलिग्रामद्वारे सातत्याने संवाद असलेल्या ज्ञानेश्वरची माहिती पथकाच्या हाती लागली. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. शुक्रवारी त्याला पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्यता वाटताच त्याने शहर सोडण्याची तयारी केली होती. मात्र, पहाटेच त्याला अटक करण्यात आली.

सिबिल स्कोअरचे आमिष, २०० पेक्षा अधिक खातेकर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर आवश्यक असतो. अनेक तरुणांना ऋषिकेश, ज्ञानेश्वरने सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगितले. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले. त्याद्वारे पैसे देण्याचे आमिष दाखवून जवळपास २०० पेक्षा अधिक खाते उघडले. निरीक्षक गीता बागवडे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली. आता ऋषिकेश, अनुराग व ज्ञानेश्वरची समाेरासमोर चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही व्यक्ती कोण ?शहर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक आरोपींची समांतर चौकशी करत आहे. ज्ञानेश्वरच्या मोबाइलद्वारे त्याने शुभम पाटील, निखिल जैन नामक व्यक्तींना क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे पाठवल्याचे समोर आले आहे. शिवाय, ओमकार अकोलकर याने पठाडेला ११ बँक खाते उघडून देत वापरण्याची अनुमती दिली. आता पोलिस या तिघांचा शोध घेत आहे.

आखाती देशांच्या संबंधामुळे धक्काया रॅकेटद्वारे देशविघातक कृत्यांसाठी पैशांचा वापर झाल्याचा दाट संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. अद्याप त्याचे सबळ पुरावे हाती लागले नसले तरी आखाती देशांमधून आलेल्या फंडिंग व व्यवहारामुळे तपास यंत्रणा अवाक् झाल्या आहेत. त्यामुळेच देशविरोधी कृत्यांचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी एटीएसने देखील तिघांची चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद