घोसला : वरठाण गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून तलावातून पाईप टाकून ते पाणी विहिरीजवळ सोडण्यात आले आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने हा पाईप पाच वेळा कापून टाकला आहे. यामुळे पाणी पुरवठ्याला अडचणी निर्माण होत असून याबाबत बनोटी पोलीस चौकीत तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन देखील अनेक विहिरींनी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला आहे. तसेच तलाव देखील मृत साठ्यात गेले आहे. वरठाण गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने ग्रामपंचायतने पर्यायी व्यवस्था म्हणून तत्काळ तलावातून पाईप टाकून ते पाणी विहिरीच्या काही अंतरावर सोडण्यात आले आहे. जेणेकरुन पाणी झिरपून विहिरीत पाण्याचे प्रमाण वाढेल. मात्र दहा दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने तो पाईप पाच वेळा कापून टाकला आहे. यामुळे गावात पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने बनोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छायाचित्र ओळ : वरठाण येथे कापून टाकलेला पाईप.
280321\dnyneshwar wagh_img-20210328-wa0071_1.jpg
वरठाण येथे कापून टाकलेला पाईप.