लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दुसºया दिवशीही एकही अर्ज आला नाही. आता सोमवारी व मंगळवारीच यासाठी गर्दी होण्याची शक्यता दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यातील ५0 टक्के जागा तर थेट महिलांना राखीव आहेत. त्यातही प्रवर्गनिहाय पुन्हा आरक्षण आहे. यात २0 जागा एकट्या जिल्हा परिषदेतून निवडून द्यावयाच्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील इच्छुकांचीच चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. काहींना चांगल्या विषय समित्या मिळालेल्या असतानाही अशांनी अर्ज खरेदी केलेली असल्याने बिनविरोधला हरताळ फासला जातो की काय? असा प्रश्न आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सर्वच पक्षीयांकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे पक्षनिहाय किती संख्या येते, यावरून सदस्यांना अर्ज भरण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. नगरपालिका व नगरपंचायतींची संख्या जास्त असल्याने या गटांतील चार जागांचा प्रश्न मात्र निवडणुकीशिवाय सुटणे शक्य दिसत नाही.शनिवारी यासाठी अर्ज खरेदी करण्यास गर्दी दिसत होती. यात १३५ जणांनी अर्ज नेला असल्याचे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले. अर्ज मात्र कोणीही भरला नाही.
डीपीसी निवडणुकीसाठी केवळ अर्जांचीच विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:48 AM