शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

औरंगाबाद जिल्ह्यातील दलित कल्याण योजना चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 5:51 PM

दोन दिवस अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योजनानिहाय आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

ठळक मुद्देदक्षता समितीच्या बैठकीला वरीष्ठ पोलीस अधिकारी येत नसल्याची नाराजी

औरंगाबाद: जिल्ह्यातील दलित कल्याण योजना चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवस अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योजनानिहाय आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. दरम्यान, या सर्व बाबींना समितीने गांभिर्याने घेतले असून सचिवांसमक्ष सर्व विभागप्रमुखांची अहवालासह साक्ष घेणार असल्याची माहिती समितीप्रमुख आ. प्रणिती शिंदे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या, पदोन्नती, आरक्षण, योजनांची अंमलबजावणी यावर महसूल, महापालिका, जिल्हा परिषद, विद्यापीठ, शिक्षण, आरोग्य, आरटीओ, समाजकल्याण विभागाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करून आढावा घेतला. काही मुद्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्याचे अहवाल मागविले आहेत. यासंबंधी पाठपुरावा करून मुंबईत बैठक घेण्यात येईल. समिती सदस्य लहू कानडे म्हणाले, विकास आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि संबधित विभागप्रमुखांकडून अहवाल मागविला आहे. सदस्य अरूण लाड म्हणाले,

अनुसूचित जाती कल्याण योजनांसाठी असलेल्या अनुदानाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. अनुदानित शाळांंचे संवर्धन झाले नाही तर दलित मुलांच्या शिक्षणाच्या वाटा बंद होण्याची भिती आहे. यावेळी समिती सदस्य यशवंत माने, किरण लहामटे, लखन मलिक, अरूण लाड, नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

वरिष्ठ अधिकारी बैठकीला येत नाहीतसदस्य राजेश राठोड म्हणाले, ॲट्रासिटीतील गुन्ह्यांत वाढ होत आहे. याबाबत दक्षता समितीची बैठक होते. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी गैरहजर असतात. हा प्रकार होऊ नये, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. भूमीहीन दलितांना कसण्यासाठी दिलेल्या जमिनींबाबत अनेक व्यवहार होत आहेत. त्यात वर्ग-२ च्या जमिनी बळकावल्या जात असल्याच्या तक्रारींत वाढ होत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, याप्रकरणात समितीकडे विशेष तक्रारी आल्यास चौकशी करण्यात येईल.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार