औरंगाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख ७३ हजार ३४५ हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले. प्राप्त तक्रारींनुसार पंचनाम्यांचे काम सध्या सुरू असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीने बाधित ५३४ गावांत सात व्यक्तींचा मृत्यू, ४७ मोठ्या, तर ७५ लहान जनावरांचा मृत्यू झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
नुकसानीत जिरायत क्षेत्रात सर्वाधिक एक लाख ४७ हजार नऊ हेक्टर, बागायत क्षेत्रात २० हजार ६२७ हेक्टर आणि फळपिकांचे पाच हजार ७०९ हेक्टरच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत ४१ हजार ५७७ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ७०९ तक्रारी नाकारण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत दहा हजार ९३९ हेक्टर पिकांचे पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले. ३१ हजार ७१९ तक्रारींनुसार पंचानाम्यांचे काम अद्याप बाकी आहे.
---
१७१ हेक्टर शेतजमीन वाहून गेली
कन्नड तालुक्यात १५९ हेक्टर, सोयगाव तालुक्यातील १२ हेक्टर शेतजमिनीवरील पिके वाहून गेली आहेत, तर सिल्लोड तालुक्यात चार पक्की घरे, कन्नड तालुक्यात १ कच्चे घर पूर्णत: पडले असून, तीन पक्क्या घरांची आणि ४२५ कच्च्या घरांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.
---
जिल्ह्यातील स्थिती
--
तालुका - बाधित क्षेत्र - पंचनामे पूर्ण - पंचनामे अपूर्ण
औरंगाबाद - ६,३८० -१६५ -९६५
गंगापूर - १३,०१० -८४० -३,४१५
कन्नड - ७८,३१४ -५,१०० -१३,५९७
खुलताबाद -०००- १३२ -४२८
पैठण -४५,२४६- ७२० -३,५७३
फुलंब्री -००० -१२० -२५२
सिल्लोड -१३,६४८ -५६२ -१,०६२
सोयगाव -६२३ -१,७४० -१,२७८
वैजापूर -१६,०९७ -१,५६० -७,१४९