येथील लताबाई विनायक ढोबळे यांच्या गट नं. २८५ मधील ७८ आर. जमिनीत अर्द्रक लागवड केली आहे. त्यांच्या शेताशेजारी असलेल्या सुखदेव रामचंद्र औटे यांनी जाणीवपूर्वक नुकसान होण्याच्या हेतूने २८ जुलै रोजी स्वत:च्या शेतात तणनाशक फवारणी करताना ढोबळे यांच्या अर्द्रक पिकावरही फवारणी केली. यात ढोबळे यांची जवळपास अर्धा एकर अर्द्रक पिकाला बाधा झाली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात लताबाई ढोबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नुकसानीची पाहणी कृषी सहाय्यक अमोल वाळुंजे, शिवराईचे सरपंच संतोष मुठ्ठे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब औटे, दिलीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिनगारे यांनी शेतात पाहणी केली. यात प्रथमदर्शी तणनाशकामुळे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. यासंबंधी कृषी विभाग कन्नड, कृषी विभाग पंचायत समिती यांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोनि. बालक पांडुरंग कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार स्वरूपचंद चव्हाण हे करीत आहेत.
300721\1642-img-20210730-wa0010.jpg
पंचनामा करताना