शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:08 IST

या प्रकरणातील माथेफिरू ताब्यात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे एका माथेफिरूने नुकसान केल्याची घटना आज, गुरुवारी सायंकाळी ५. ३० वाजता घडली. महेश मुरलीधर कांबळे असे माथेफिरूचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

विद्यापीठ गेटसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या खाली  'The Symbol of Knowledge - Dr. B. R. Ambedkar' असा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेला आहे. आज सायंकाळी एक माथेफिरू या परिसरात रेंगाळत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार हा माथेफिरू पहिल्यांदा एका मुलीच्या मागे चाकू घेऊन लागला होता. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर त्याने अचानक पुतळ्याकडे मोर्चा वळवला. पुतळ्याखालील डिजिटल बोर्डमधील अक्षर चाकूने तोडण्याचा प्रयत्न करत नुकसान केले.

हे निदर्शनास येताच पुतळा परिसरात जमाव जमला. यावेळी संतप्त जमावाने माथेफिरूस चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे, निरीक्षक मंगेश जगताप, शेषराव खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माथेफिरूस ताब्यात घेतले. या माथेफिरुचे नाव महेश मुरलीधर कांबळे (३६, रा. बेगमपुरा, लालमंडी) असून, त्याच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे आणि तो नशेच्या आहारी गेल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. आता परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता बाळगावी असे, आवाहन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केले आहे.

पुण्यात उपचार, आई, भावाला मारहाणमहेशने ४:३० वाजता घरात पहिले आई, भावाला मारहाण केली. त्याची आई ही तक्रार करण्यासाठी बेगमपुरा ठाण्यात गेली. त्याच दरम्यान महेशने हे कृत्य केले. महेशची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तो मनोरुग्ण असून त्याच्यावर काही दिवस पुण्यात देखील उपचार करण्यात आल्याचे कुटुंबाने पाेलिसांना सांगितले. दरम्यान, रात्री नागराज गायकवाड यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमी महेशला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरCrime Newsगुन्हेगारी