औरंगाबाद : रस्त्यात अडसर ठरणा-या दमडी महलचे अवशेष अलीकडेच महापालिकेने बुलडोजर लावून पाडले होते. उर्वरित शिल्लक अवशेष पाडू नयेत, अशी शहरातील इतिहासप्रेमींची मागणी होती. रस्ता रुंदीकरणासाठी महल पाडावा, अशी मागणी एमआयएम नगरसेवकांकडून सुरू होती. अखेर मनपा प्रशासनाने पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन मंगळवारी दमडी महल जमीनदोस्त केले.
दमडी महल जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:16 AM