शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

दररोज १४ हजार वाहनांचा राबता असलेल्या क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 2:06 PM

पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात.

- विकास राऊतऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाच्या बांधकामाला १० वर्षे झाली असून आता पुलावरील सरफेसवर सहा इंचांपेक्षा मोठा गॅप पडला आहे. पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुलावर रोज १४ हजारांहून अधिक वाहनांचा राबता आहे.

जालना रोडवर एमएसआरडीसीने बांधलेले पाच उड्डाणपूल आहेत. सेव्हन हिल्स आणि क्रांती चौक उड्डाणपूल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याचे सांगण्यात येते. रेल्वे स्टेशनचा पूल बांधकाम विभागाने बांधलेला असून तो देखील मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु पालिका मात्र कोणताही पूल हस्तांतरित केलेला नाही, असे ठामपणे सांगते. २ ते ६ एमएमच्या आसपास गॅप असेल, तर काही हरकत नसते; परंतु पुलावरील स्लॅबला जोडणीत पडलेला गॅप सहा इंचांच्या पुढे असल्याचे दिसत आहे.

क्रांती चौकातील उड्डाण पुलाच्या डिझाईनला २००५-०६ साली मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया होऊन फेब्रुवारी २००९ मध्ये पुलाचे काम सुरू झाले. किचकट डिझाईनमुळे पुलाच्या कामाला २०१० साली मुदतवाढ दिली. त्यानंतर मे २०११ मध्ये पुलाच्या अदालत रोडकडील दिशेने असलेल्या पिलर्सला तडे गेले. त्यामुळे पुलाच्या गुणवत्तेवरून मोेठे वादळ उभे राहिले. कंत्राटदाराला पुन्हा नव्याने पिलर्स उभे करावे लागले. जे पिलर्स नव्याने उभारले होते, त्याच्यावरील सरफेसमध्ये मोठा गॅप पडला असून त्याची तांत्रिक तपासणी न केल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजूलाच सुरू आहे पुतळ्याचे कामपुलाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यावर दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जात आहे. पुतळ्याची उंची पुलाच्या सदोष डिझाईनमुळे वाढवावी लागली आहे.

कोणत्या पुलावर किती खर्च ?सिडको बसस्थानक पूल ७२.४२ कोटीसेव्हन हिल्स १०.७९ कोटीमोंढा नाका २८.७० कोटीक्रांती चौक २२.८७ कोटीमहावीर चौक ३४.९८ कोटीसंग्रामनगर २५ कोटीएकूण सुमारे १९४.७६ कोटी........

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका