---------
न्यू एस. बी. एच. काॅलनीत
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
औरंगाबाद : शहरातील न्यू एस. बी. एच. काॅलनीत मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवस आणि रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांची झुंडी रस्त्यावर उभे राहतात. वाहनाचालकांचा पाठलाग करतात. मनपाचे पथक या भागात श्वान पकडण्यासाठी येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
------------
शहर बसथांब्याचे काम रेंगाळले
औरंगाबाद : पैठण रोडवर शहर बसथांब्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. बसथांब्याचा केवळ लोखंडी सांगाडा उभारण्यात आला आहे. त्यामुळे बसथांब्याचा प्रवाशांना उपयोगच हाेत नाही. थांब्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
----------
चेतक घोडा चौक खड्ड्यांत बुडाला
औरंगाबाद : शहरातील चेतक घोडा चौकाला सध्या खड्ड्यांचा विळखा पडला आहे. चौकातील तिन्ही मार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडले आहे. रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
सन्मित्र कालनीत कचऱ्याचे ढिग
औरंगाबाद : शहरातील सन्मित्र कालनीतील रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिग पडून आहे. महापालिकेकडून कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिग अनेक दिवस तसेच पडून रहतात. याविषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेने नियमितपणे कचरा उचलण्याची मागणी होत आहे.