शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

गडद भगवा रंग, मोठे फळ; शेतकऱ्याने विकसित केलेल्या डाळिंबाच्या ‘शरदकिंग’ला ‘पेटंट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 1:28 PM

सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले.

- श्रीकांत पोफळेकरमाड : औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भोसले यांनी डाळिंबाचे ‘शरदकिंग’ नावाने वाण विकसित केले आहे. या वाणाला राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अंतर्गत ‘स्वामित्व हक्क’ (पेटंट) मिळाले आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी पत्र नुकतेच विठ्ठल भोसले यांना प्रदान केले.

सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले. त्यावर अभ्यास करून नवीन वाण विकसित केले. त्याचे ‘शरदकिंग’ असे नामकरण केले. त्यांची जडगावला १८ एकर शेती असून त्यातील ५ एकरमध्ये त्यांनी स्वतः विकसित केलेल्या ‘शरदकिंग’ या वाणाचे डाळिंब लावले आहे.

‘शरदकिंग’ची वैशिष्ट्य...गडद भगवा रंग ,आकाराने मोठे, ४०० ते ८०० ग्रॅमपर्यंत वजनाचे फळ, झाडांची व फळांची सेटिंग चांगली होऊन जवळपास ८० टक्के फळ एकाच आकाराचे मिळतात, साल जाड असल्याने सनबर्नचा प्रादुर्भाव देखील कमी होतो ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

आमच्या टीमने पाठपुरावा केला आमच्या टीमने त्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शन केले. संशोधन केंद्राची टीम सातत्याने पाठपुरावा करीत होती, संपर्कात होती त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळाले. पेटंट मिळाल्याचा आनंद आहे.- डॉ.राजीव मराठे, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.

पेटंट मिळाल्याचा आनंदमार्केटमध्ये डाळिंबाच्या आकाराला, वजनाला व कलरला खूप महत्त्व आहे. शरदकिंग या वाणामध्ये या सर्व गुणांचे सर्वोत्तम पत राखण्यात व निसर्गाशी झगडत असणाऱ्या बळीराजाला प्रतिकूल परिस्थितीत आपण काहीतरी चांगलं देऊ शकलो याचा मनस्वी आनंद आहे- विठ्ठल भोसले, जडगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद