अंध विद्यार्थ्यांचीही अशीच गत आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक अंध विद्यार्थ्यांना परीक्षेला लेखनिक मिळण्यासाठी शोधाशोध करावी लागली होती. अजूनही ज्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, त्यांचा लेखनिकासाठी असलेला शोध थांबलेला नाही.
चौकट :
जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र या संस्थेत मराठवाड्यातील जवळपास ५०० ते ६०० अंध व्यक्तींची नोंद झालेली आहे. यापैकी औरंगाबाद शहरात राहणाऱ्या दोन अंध व्यक्तींना कोरोना झाला होता, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
चौकट :
प्रतिक्रिया-
ज्याप्रमाणे महिला बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमात काम करणारे लोक अत्यावश्यक सेवेत येतात, त्याप्रमाणे अंध व्यक्तींच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही अत्यावश्यक सेवेत गणले जावे. कारण अंध व्यक्तींच्या आश्रमात काम करणारे अनेक लोक आहेत आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या येण्याजाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक अडचणी वाढल्या आहेत.
- ज्ञानेश्वर वडकर
व्यवस्थापकीय अधीक्षक
रंगलाल बाहेती अंध मुलींची कार्यशाळा
चौकट :
आधारही एकमेकांचाच !
१. अंध व्यक्तींना रस्ता ओलांडताना किंवा दैनंदिन काम करताना बऱ्याचदा दुसऱ्यांची मदत घ्यावीच लागते. ही मदत घेताना स्पर्श होतो. त्यामुळे आता अंध व्यक्तींना अशी मदत मिळण्यासही अडचण होते आहे. याशिवाय रेल्वे, बस यामध्ये बहुतांश अंध व्यक्ती वस्तू विकण्याचे काम करतात. या व्यक्तींचे रोजगार बुडाले आहेत. अनेक अंध व्यक्ती कलाकार आहेत आणि विविध ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. आता कार्यक्रम बंद असल्याने या लोकांना उत्पन्नासाठी दुसरे काम शोधावे लागत आहे.
- माणकेश्वर बडे
२. रोजगार आणि स्वयंरोजगार या समस्या कोरोनाने निर्माण केल्या आहेत. सामान्य माणूसही आता अडचणीत आला आहे, असे असताना अंध व्यक्तींच्या समस्या तर अधिकच तीव्र झालेल्या आहेत. अंध व्यक्तींसाठी नोकरीच्या संधी आधीच खूप मर्यादित असतात. त्या ही आता खुंटल्या आहेत. यामुळे अंधांच्या पुनर्वसना परिणाम होतो. सार्वजनिक वाहतूक आणि तात्पुरती दुकाने बंद झाली असल्याने या गोष्टींशी निगडीत व्यवसाय करणारे अनेक अंध अडचणीत आले आहेत.
- रघुनाथ बरड