अनिल गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव घाट (ता.पाटोदा) : गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे. हा मेळावा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पालकमंत्री पंकजा मुंडे या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.संत भगवानबाबांची पवित्र जन्मभूमीभगवानबाबांनी आयुष्यभर सामान्य समाजाला शिक्षणाचा, संस्काराचा मार्ग दाखवला. या महापुरुषांची सावरगावघाट ही जन्मभूमी आहे. मात्र, येथे कसलाच विकास नसून ही पवित्र भूमी भविष्यात विकसित होईल, असा आशावाद या मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. पाटोदा तालुक्यात बीड - नगर राज्य मार्गापासून १० किमी अंतरावर ही भूमी दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाली आहे. येथे जिल्ह्याच्या कानाकोपºयातून हजारो कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मान्यवरांची उपस्थितीपालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध खात्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. भगवानबाबांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे भक्तांशी संवाद साधतील असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:22 AM