जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच दिवस जल्लोष आणि नेल बाईटींग मॅचेसचा ठरला. विविध शाळांचया संघांनी नेत्रदीपक कामगिरी केली. आज झालेल्या स्पर्धांमध्ये अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल, गोल्डन ज्युबली, किडस केंब्रीज आणि एमआरडीएचे वर्चस्व राहिले. बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आज बिगुल वाजला. अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलच्या प्रांगणात रंगलेल्या या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षीय मुलांनीच बाजी मारली. सकाळच्या सत्रात झालेल्या मॅचेसमध्ये अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलने बाजी मारली तर गोल्डन ज्युबली स्कूलने सामना एकहाती जिंकला. दुपारच्या सत्रात एनआरडीएने ज्ञानदीप शाळेच्या संघावर आरामात विजय मिळविला. किडस केंब्रीजने अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल विरूद्ध सांघिक खेळ करताना १४८ धावा काढल्या. यात संकेतच्या ६० धावाचे योगदान होते. तत्पूर्वी लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन लोकमतचे शाखाधिकारी मोहित पवार, अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य प्रविण झीर, समर्थ म्युझिकल्स, स्पोर्टस अॅण्ड फिटनेसचे सतीश कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात पंच म्हणून सुप्रिया सोनवणे, प्रियंका दायमा, सीमा पवार, ऋषी गरळ आणि पवन ठाकूर यांनी काम पाहिले.
थरार, उत्सुकता, जल्लोष विजयाचा दिवस
By admin | Published: February 19, 2016 12:18 AM