शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

रस्ते दुरुस्तीसाठी ‘डेड लाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:24 AM

आर्थिक वर्ष मावळण्यासाठी आता अवघ्या चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उपअभियंत्यांनी येत्या सोमवारपर्यंत जिल्हाभरातील रस्ते दुरुस्तीसाठी कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल, याचा अहवाल (पीसीआय इंडेक्स) सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील यांनी गुरुवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येऊन आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईपणामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकही काम मार्गी लागलेले नाही. आर्थिक वर्ष मावळण्यासाठी आता अवघ्या चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उपअभियंत्यांनी येत्या सोमवारपर्यंत जिल्हाभरातील रस्ते दुरुस्तीसाठी कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल, याचा अहवाल (पीसीआय इंडेक्स) सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील यांनी गुरुवारी दिले.सभापती विलास भुमरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बांधकाम विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रभारी कार्यकारी अभियंता परदेशी यांच्यासह सर्व उपअभियंते, सदस्य शुभांगी काजे, संदीप पाटील, सय्यद कलीम, अक्षय जायभाये, शिल्पा कापसे आदींची उपस्थिती होती.बैठकीत सुरुवातीलाच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या विषयावर चर्चा झाली. दुरुस्तीच्या कामासाठी नवीन निकषानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. त्यानुसार उपअभियंत्यांनी कोणत्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत रस्ते दुरुस्तीसाठी (पीसीआय इंडेक्स) प्राधान्यक्रम अहवाल सादर केलाच पाहिजे.डिसेंबरअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदार संस्थांना कार्यारंभ आदेश दिले, तरच मार्चअखेरपर्यंत प्राप्त निधी खर्च होऊ शकेल.या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीकडून २४ कोटी रुपयांचे नियत्वे मंजूर केले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने प्राप्त नियत्वेच्या दीडपट अर्थात ३६ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे.हा निधी दोन वर्षांसाठी असला तरी वेळेत तो खर्च झाला पाहिजे, यावर बांधकाम समितीने भर दिला आहे. उपअभियंत्यांनी पीसीआय इंडेक्स कार्यकारी अभियंत्यांना सादर के ल्यानंतर कार्यकारी अभियंता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिक्कामोर्तब करील.