जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ आरटीई जागांसाठी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ७ एप्रिल रोजी लकी ड्रॉ काढण्यात आला होता. पहिल्या फेरीत ३,४७० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून, शुक्रवारपर्यंत २ हजार ३११ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर १ हजार ३९० विद्यार्थ्यांनी तात्पुरती प्रवेश केले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरेसे नाही. तर सर्व शिक्षा अभियानमधील कर्मचारी प्रशिक्षित आणि कायमदेखील नाही. मुळात आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण विभाग उदासीन आहे. शिक्षण विभागातील अधिकारी आणि इंग्रजी शाळा संचालक ही प्रक्रिया राबविण्यास उत्सुक नाहीत, असे आरटीई पालक संघाचे प्रशांत साठे यांचे म्हणणे आहे.