शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत

By स. सो. खंडाळकर | Updated: September 11, 2024 19:57 IST

आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा

छत्रपती संभाजीनगर : आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने काही लाडक्या बहिणी आश्चर्यचकित झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जात आधार लिंक करून दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. पण, शेवटचे आधार फिडिंग ज्या बँकेच्या अकाउंटशी झाले, तेथे पैसे जमा झाले. हे बरेच दिवस या लाडक्या बहिणींना कळलेच नाही. त्यामुळे आपले पैसे आले कसे नाही, या विवंचनेत त्या राहिल्या.

तेजश्री दांडो (रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांनी अर्जात कॅनरा बॅँक लिहिलेले असतानाही त्यांना बँक ऑफ बडोद्यातून पैसे मिळाले. ताराबाई जैस्वाल (जुना मोंढा, भवानीनगर) यांनी अर्जात कॅनरा बँक नमूद केले होते. पण, त्यांना पैसे मिळाले स्टेट बॅँक ऑफ इंडियातून. पूजा अनिल आवडे (रा. कबीरनगर) यांनी अर्जात बँक ऑफ बडोदा नमूद केले. पैसे मिळाले स्टेट बँक ऑफ इंडियातून. आरती दीपक सोनकामळे (रा. चौसरनगर) यांनी अर्जात बँक ऑफ महाराष्ट्र लिहिलेले होते. पण, त्यांना भारत फायनान्शियल कंपनी, टाय विथ इंडसइंड बँकेतून पैसे मिळाले. अश्विनी दत्ता फुके (रा. एन-९, टीव्ही सेंटर) यांना नमूद केल्याप्रमाणे कोटक बँकेतून पैसे न मिळता पोस्ट खात्यातून पैसे मिळाले. आधार लिंकपेक्षाही शेवटची फिडिंग कुठल्या अकाउंट नंबरला झालेली आहे, तिथे पैसे जमा झाले. पण, लाडक्या बहिणी अर्जात नमूद बँकांमध्ये जाऊन चौकशी करू लागल्या.

महिलांनी घाबरू नयेहा गैरव्यवहार वगैरे काही नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जाऊ नये. त्यांनी हव्या असलेल्या करंट अकाउंटशी आधार फिडिंग करून घ्यावे, तेथे त्यांना पैसे मिळत जातील. लिंक आणि फिडिंग हा वेगवेगळा विषय आहे, असा खुलासा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधीक्षक युवराज यांनी ‘लोकमत’कडे केला.

३ लाख ६९ हजार अर्ज मंजूरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत ३ लाख ९० हजार ७२७ अर्ज आले. त्यापैकी ३ लाख ६९ हजार १६५ अर्ज मंजूर झाले. २९० प्रकरणे प्रोव्हिजनल अप्रूव्हलसाठी प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ७ हजार ६०५ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर, २ हजार ७५४ प्रकरणे नामंजूर केलेली आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातून मिळाली.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAurangabadऔरंगाबाद