हिंगोली : कळमनुरी ते हिंगोली जाणाऱ्या रोडवरील लासीना पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भरधाव बसची दुचाकीस धडक बसून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. याप्रकरणी शनिवारी कळमनुरी पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लासीना येथील प्रभू उर्फ प्रभाकर लक्ष्मीकांत काळे (वय ४२), रत्नशील देवबा कांबळे (३०) हे दोघे दुचाकीवरुन जात होते. वसपांगरा शिवारातील लासीना पाटीजवळ समोरून आलेल्या बस क्र. एमएच २० एन ९६६४ च्या चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात प्रभाकर काळे, रत्नशिल कांबळे यांचा मृत्यू झाला. तसेच रस्त्याच्या बाजूला उभे असलेले साहेबराव व्यंकटराव पोले (रा. लासिना) यांना सदर अपघातात गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचे २५ हजारांचे नुकसान झाले. याबाबत प्रतापराव लक्ष्मीकांत काळे (रा. लासीना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जाधव करीत आहेत.दुचाकीवरील दोघे जखमीसेनगाव ते रिसोड रोडवरील कोळसा शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर २४ सप्टेंबर रोजी धडक झाली. यात सुदाम रामकिशन काळे, अमोल सुभाष नरवाडे हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
दोघांचा मृत्यू; चालकावर गुन्हा
By admin | Published: September 28, 2014 11:55 PM