औरंगाबाद : नवरात्रीचे घट विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दु:खद घटना मंगळवारी (दि.११) सकाळी परदरी तांडा (ता.औरंगाबाद) परिसरात घडली.दिशा सुभाष राठोड (१५) आणि ऋत्विक रावसाहेब राठोड (९) असे मृत बहीण-भावाचे नाव आहे. ते दोघे चुलत भाऊ-बहीण आहेत. या घटनेमुळे परदरी तांडा (ता.औरंगाबाद) येथे शोकाकुल वातावरण झाले. येथील नागरिकांनी दसराही साजरा केला नाही.या घटनेविषयी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले की, राठोड कुटुंबियांनी नवरात्रीत परंपरेनुसार घरामध्ये घट बसविले होते. या घटाचे दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करायचे होते. विसर्जन पाण्यामध्येच करणे योग्य राहील, असा विचार करून दिशा आपला चुलतभाऊ ऋत्विक आणि इतर मुले-मुली गावाजवळील पाझर तलावावर गेले. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने (पान २ वर)
तलावात बुडून भावा-बहिणीचा मृत्यू
By admin | Published: October 12, 2016 12:59 AM