माजलगाव / धारूर : मोबाईल चार्जिंगला लावताना विजेचा जोरदार धक्का बसून एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले. ही दुर्दैवी घटना धारूर तालुक्यातील चाटगाव येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली.ईश्वर रामभाऊ काळदाते (वय १८) असे मयताचे नाव आहे. राहत्या घरी विद्युत बोर्डात मोबाईल चार्जिंगसाठी वायर जोडताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी नारायण कुरूंद (रा. धारूर) यांच्या खबरीवरून माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मोबाईल चार्जिंगला लावताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
By admin | Published: January 07, 2017 10:58 PM