नितीन वामन राणे यांची वाळूज एमआयडीसीमध्ये अॅमिगोज इंडस्ट्रीज आहे. जॉबवर्क असल्यामुळे मंगळवारी रात्री राणे हे कंपनीतच थांबले होते. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास राणे हे प्रातर्विधीला गेले असता बेशुद्ध होऊन कोसळले. हा प्रकार लक्षात येताच राणे यांचे भाऊ शेखर राणे यांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करीत आहेत.
फोटो क्रमांक- नितीन राणे (मयत)
------------------------
रांजणगावात ऊर्जा संवर्धन सप्ताह
वाळूज महानगर : रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ऊर्जा संवर्धन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. महाऊर्जा विभागीय कार्यालयाच्या वतीने शाळेत आयोजित या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विकास रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत प्रदीप सुखलाल धामणे याने प्रथम, तर पायल काळबांडे व मसरूर शेख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत कावेरी बाळू साळवे हिने प्रथम, तर पायल रामू सवई व मोनिका मुंजाजी पांचाळ या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रशालेच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय कलाभूषण पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त कला शिक्षक गंभीरराव पाटील, प्रकल्प अधिकारी विजय काळे, सोज्वळ जैन, अशोक कानडे, संतोष साबळे, मुख्याध्यापक विजय चौधरी आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वाटप करण्यात आले. सप्ताह यशस्वीतेसाठी प्रशालेच्या सुरेखा राठोड, मंजूषा श्रीरामवार, विजया मोरे, शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
फोटो ओळ-
रांजणगाव जि.प. शाळेत ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.
-------------------