या विषयी अधिक माहिती अशी की, स्वप्नील दीपक पवार यास ८ मार्चला ताप आल्याने त्यास जोगेश्वरी येथील पटेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. या खासगी रुग्णालयातील डॉ. पटेल यांनी स्वप्नील याची तपासणी करून त्यास इंजेक्शन व औषधाच्या गोळ्या दिल्या. रात्री गोळ्या घेतल्यानंतर स्वप्नील याच्या डाव्या पायात ठणक सुरू झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी स्वप्नीलच्या नातेवाइक़ांनी डॉ. पटेल यांच्याशी संपर्क साधून त्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा औषधी दिली होती. मात्र औषधी घेतल्यानंतरही त्रास सुरूच असल्याने स्वप्नील याची आई विद्या यांनी बुधवार (दि.१०) सायंकाळी मुलाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (दि.११) दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास स्वप्नीलची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चुकीच्या उपचारामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
फोटो क्रमांक- स्वप्नील पवार (मयत)