शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरी हक्काच्या योजनेचा लाभ नाही; मनपाचा आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास

By मुजीब देवणीकर | Published: August 02, 2023 12:51 PM

महापालिकेतील मजूर, शिपाई, माळी, पाणीपुरवठा मजूर इ. प्रवर्गात काम करणाऱ्या वर्ग-४ मधील तब्बल २०० वर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून प्रगती योजनेचा लाभच देण्यात आला नाही.

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांचा महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी छोट्या-छोट्या कामांसाठी कशा पद्धतीने छळ करतात, हे सर्वश्रुत आहे. वर्षानुवर्षे महापालिकेतच सेवा बजाविलेल्या कर्मचाऱ्यांनाही झारीतील शुक्राचार्य सोडायला तयार नाहीत. वर्ग- ४ श्रेणीमधील तब्बल २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला नाही. यातील ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनंतर मृत्यूही झाला; तरी प्रशासनाला काही पाझर फुटला नाही.

कोणत्याही शासकीय सेवेत दाखल झालेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला अगोदर १२ वर्षांची वेतन निश्चिती देण्यात येते. त्यानंतर २४ वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. महापालिकेतील मजूर, शिपाई, माळी, पाणीपुरवठा मजूर इ. प्रवर्गात काम करणाऱ्या वर्ग-४ मधील तब्बल २०० वर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभच देण्यात आला नाही. यातील अनेकांना पेन्शनसुद्धा मंजूर झालेली नाही. जे कर्मचारी मरण पावले, त्यांचे कुटुंबीय महापालिकेच्या आस्थापना विभागाचे उंबरठे झिजवीत आहेत. कर्मचारी निव्वळ आश्वासने देऊन त्यांची वर्षानुवर्षे बोळवण करीत आहेत. २०१८ पासून महापालिकेतील आस्थापना समितीची बैठकच झाली नसल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आलेले नाहीत. वर्ग-३ श्रेणीतील ३५ वर कर्मचारी याच संकटाला तोंड देत आहेत.

कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणीनिवृत्तीनंतर आलेल्या पैशातून मुला-मुलींचे लग्न, छोटासा व्यवसाय, घरकुल इ. स्वप्ने या चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांनी रंगविली होती. २४ वर्षांची वेतनश्रेणी नाही, पेन्शन नाही. उलट सेवापुस्तिकेत काही कारकून नको ते शेरे मारून होणारे कामही न होण्यासारखे करून ठेवतात. जे कर्मचारी या कारकून मंडळींना ‘खूश’ करतात. त्यांचे काम काही दिवसांत पूर्ण होते, हे विशेष.

अतिरिक्त आयुक्त न्यायालयातमहापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांनाही असाच त्रास देण्यात येत होता. त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने थकीत रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले. प्रशासकांनी त्यांची फाइल दाबून ठेवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करण्याचे आदेश काढले; पण वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील गरीब कर्मचारी न्यायालयात जाऊ शकत नाहीत.

केस-१मनपाच्या उद्यानातील प्रमुख माळी रमाबाई भोपाल कणिसे यांना २०१७ मध्ये २४ वर्षांचा लाभ देणे आवश्यक होते. त्यांना पेन्शनमध्ये ७ व्या वेतन आयोगाचा लाभही दिला नाही. डी.ए.सुद्धा सहाव्या वेतन आयोगानुसार मनपा देत आहे.

केस-२सुभाष गणपतराव सोनवणे हे माळी प्रवर्गातील मूकबधिर कर्मचारी असून, ते एप्रिल २०२३ मध्ये निवृत्त झाले. २४ वर्षांची वेतनश्रेणी मिळेना. वास्तविक पाहता हा लाभ २००८ मध्येच मिळायला हवा होता.

केस-३शिपाई सय्यद कबीर सय्यद फरीद दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांना आजपर्यंत २४ वर्षांची वेतनश्रेणी मिळाली नाही. त्यांचे कुटुंबीय मनपाचे उंबरठे झिजवीत आहेत.

काय म्हणतात अधिकारी?वर्ग-४ मध्ये २०० वर कर्मचाऱ्यांना २४ वर्षांचा लाभ मिळाला नाही. वर्ग-३ मध्ये ३५ पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. लवकरच आस्थापना समितीची बैठक होईल. १५ ऑगस्टपूर्वी ही सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन आहे.- अभय प्रामाणिक, सहायक आयुक्त, आस्थापना.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका