३३ जण कोरोनामुक्त : २४५ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यू टळला. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ४४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३३ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३९२ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,२४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४४ रुग्णांत मनपा हद्दीतील ४२, ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २६ आणि ग्रामीण भागातील ७, अशा एकूण ३३ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
पुंडलिकनगर ३, बन्सीलालनगर १, जानकी हॉटेल १, पद्मपुरा १, न्यू श्रेयनगर १, श्रेयनगर १, पैठण रोड १, शिवशंकर कॉलनी १, जवाहर कॉलनी १, जवाहरनगर पोलीस स्टेशन १, सिडको एन-४ येथे १, संजयनगर १, म्हाडा कॉलनी ३, होनाजीनगर १, ठाकरेनगर १, बीड बायपास १, एन-१२, हडको १, सातारा परिसर १, धावणी मोहल्ला १, हर्सूल टी पॉइंट १, एन-४, सिडको २, एम. जी. एम. हॉस्पिटल परिसर १, अन्य १५.
ग्रामीण भागातील रुग्ण
सिल्लोड १, अन्य १