पळाशी येथील सुनील सोनवणे यांच्याकडे एक हेक्टर जमीन आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र बँक व सोसायटीचे ३५ हजार रुपये व फायनान्सचे दीड लाख रुपये कर्ज होते. खरिपात कपाशी पीक वाया गेले. लागलेला खर्चही निघाला नाही. रब्बी पीकही फारशे हाती लागले नाही. यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, कर्ज कसे फेडायचे, याची त्यांना चिंता होती. त्यात फायनान्सकडून कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तगादा असल्याने शेवटी त्यांनी नैराश्यातून शेतात विष प्राशन करून जीवन संपविले. कुटुंबीयांनी त्यांना बनोटी आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
फोटो कॅप्शन : पळाशी येथील मयत सुनील सोनवणे.
030521\narayan chaudhari_img-20210503-wa0011_1.jpg
सुनिल वाल्मीक सोनवणे