शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

शेतकऱ्याची फसवणूक करणारा जेरबंद

By admin | Published: March 31, 2017 12:02 AM

उस्मानाबाद : शासकीय विहीर मंजूर झाल्याचे सांगून एका शेतकऱ्यांकडून १६ हजार रूपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़

उस्मानाबाद : शासकीय विहीर मंजूर झाल्याचे सांगून एका शेतकऱ्यांकडून १६ हजार रूपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही कारवाई ३० मार्च रोजी दुपारी करण्यात आली असून, आरोपीकडून एक दुचाकी व मोबाईलही जप्त करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील विश्वासनगर भागातील राजाराम मारुती कानडे यांच्या घरी २५ मार्च रोजी दोन इसम दुचाकीवरून आले होते़ ‘आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत़ तुम्हाला शासकीय विहीर मंजूर असून, त्याचे अडीच लाख रूपये मिळणार आहेत़’ असे त्यांनी कानडे यांना सांगितले़ तसेच फाईल पंचायत समितीत दाखल करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स १६ हजार रूपये भरावे लागतील, असे सांगून रक्कम त्यांच्याकडून नेली़ त्यांनी पुन्हा मोबाईलवर फोन करून आणखी ११ हजार रूपये लागतील, अशी मागणी केली़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कानडे यांच्या लक्षात आले़ त्यानंतर त्यांनी २९ मार्च रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधित इसमांविरूध्द फिर्याद दिली होती़ या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी फिर्यादीकडून आरोपीचे वर्णन माहिती करून घेतले़ त्यानंतर पोलिसांनी संशयित अमित रामा झेंडे (रा़ काकानगर, उस्मानाबाद) याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्या़ त्यावेळी झेंडे याने कानडे यांची फसवणूक केल्याची माहिती दिली़ पोलिसांनी झेंडे याच्याकडून रोख १५ हजार ५०० रूपये, एक दुचाकी व एक मोबाईल जप्त केला़ झेंडे याला पुढील कार्यवाहीसाठी तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोहे कुलकर्णी, हबीब, पोना मुल्ला, पोशि अमोल पवार यांच्या पथकाने केली़