छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे डिसेंबरचे वेतन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे घाटीत परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे. वेळेवर पगार न झाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. आज चार वाजेपर्यंत पगार झाला नाही तर बेमुदत संप पुकारला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
घाटीत परिचारिकांनी तात्काळ वेतन देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी इंदुमती थोरात, मकरंद उदयकार,महेंद्र सावळे, हेमलता शुक्ला, प्रतिभा अंधारे , कालिंदी इंधाते, वंदना कोळंनूरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिका, ब्रदर उपस्थित होते.
परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आर्थिक अडचणीत
डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. ८ तारखेला आंदोलन करणार पण याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत बोलणे झाले. त्यांनी प्रयत्न केल्याने आंदोलन स्थगित केले. मात्र, आज २३ तारीख आहे, अद्यापही पगार झाली नाही. मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यासाठी पैसे लागतातच. परिचारक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पगार नसल्याने अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. - आंदोलक