शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

राज्यातील उर्दू शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; खंडपीठाचा राज्यशासनास आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:52 AM

राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी राज्य शासनाला दिला आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना आणि डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक ३७ उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिकांच्या शाळांमध्ये उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत.

औरंगाबाद : राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी राज्य शासनाला दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना आणि डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक ३७ उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार राज्यात उर्दू प्राथमिक शाळांमध्ये तसेच उर्दू वर्ग असलेल्या जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिकांच्या शाळांमध्ये उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. तसेच टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परीक्षा) पात्रताधारक उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती. 

राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा आणि टी.ई.टी. उमेदवारांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शासनाला अनेकदा दिले. मात्र, शासनाकडून माहिती उपलब्ध झाली नाही. २३ एप्रिल २०१८ रोजी वरील याचिकेवर सुनावणी झाली असता याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. विठ्ठलराव सलगरे यांनी असे निदर्शनास आणून दिले, की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचिकाकर्ते २०१० मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जादा गुण प्राप्त करून सी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण झाले असून, प्राथमिक शिक्षकांच्या पदासाठी पात्र आहेत. त्यांना उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर नियुक्ती देण्याबाबत शासनाला निर्देश द्यावेत. उर्दू शिक्षक संघटनेने अनेकदा विनंती करूनही रिक्त पदे भरली नाहीत.

यावर शासनातर्फे सरकारी वकिलांनी सांगितले की, शिक्षक पात्रतेची परीक्षा डिसेंबर २०१७ मध्ये झाली आहे. ‘आॅन लाईन’ पद्धतीने शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. सुनावणीअंती खंडपीठाने स्पष्ट केले, की शासनाने राज्यात उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा आणि त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन ‘स्टॉप गॅप’ व्यवस्था म्हणून डी.एड., डी.टी.एड. आणि सी.ई.टी. उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विचार करणे आवश्यक होते. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाState Governmentराज्य सरकार