शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

By admin | Published: February 27, 2017 12:33 AM

लातूर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत.

दत्ता थोरे लातूरपालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत. आ. विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन अहमदपूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे वाढविलेले बळ आणि आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे अशा साऱ्या ग्रामीण नेत्यांना घेऊन त्यांनी बांधलेली पक्षाची मोट हेच भाजपाच्या जिल्हा परिषदेत मिळालेल्या बहुमताचे रहस्य आहे. पण त्यांच्यासकट भाजपातले हे नेते एकत्र येणे ही बाब पक्षाला जितकी चांगली आहे, तितकी ती कायम एकत्रच राहणे अवघड. ही एकी एकसंघ असणारी ‘मोट’ राहते की जिल्हा परिषदेपुरती बांधलेली ‘मोळी’ यावर खुद्द संभाजीराव आणि भाजपाचे पुढचे यश अवलंबून आहे. ३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेतून हद्दपार होईल, हे कुणी सांगितले तरी खरे वाटले नसते. पण हे घडले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी हे करून दाखविले. यासाठी त्यांनी केलेल्या व्यूहरचना निर्णायक ठरल्या. पहिला अफलातून मार्इंड गेम म्हणजे आ. विनायकराव पाटील यांना भाजपात घेणे. विनायकरावांच्या भाजपा प्रवेशाने स्वत: लातूर जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार झाले. या तीनही आमदारांच्या आपापल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३५ जागा येतात. तर राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात २३. याशिवाय लातूर ग्रामीणमधून विधानसभेला पराभव झाल्यानंतर दररोज मशागत करणाऱ्या रमेश करांडांनी चौथा विधानसभा मतदारसंघ पक्षासाठी जिद्दीने लढविला. खुद्द आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावातली पंचायत समिती त्यांनी खेचून आणली. भाजपाला मिळालेले यश हे चार विधानसभा मतदारसंघातलेच आहे. स्वत:च्या मतदारसंघात अपयश नको म्हणून शिरुर अनंतपाळच्या अ‍ॅड. संभाजीराव पाटील यांनाही संभाजीरावांनी पक्षात घेतले. छोटा-मोठा कशाला घ्यायचा असा संकुचित विचार केला नाही. या चार विधानसभा मतदारसंघातच पक्ष जिंकला. औशातल्या तीन जागा बोनस ठरल्या. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा आमदारकीची निवडणूक लढावी तशाच पध्दतीने लढली. आपले सांभाळून दुसरीकडे कुणी गेले नाही की 'वाकूनही' बघितले नाही. इकडे पालकमंत्र्यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याबरोबर शाब्दिक लढाई खेळली. ज्यामुळे ते मतदारात चर्चेत आले. साधेपणाने लोकात गेले. दाढीही केली नाही. प्रचाराला गेल्यावर हरिनाम सप्ताह दिसला तर मांडी घालून बसले. महाप्रसाद म्हणून तिथेच जेवले. हे आतून की नाटक याचा निष्कर्ष अवघड आहे, पण मतदारांना नेमके हेच भावत गेले आणि त्यांची छबी बनत गेली. वरपासून खालपर्यंत भाजपा नेत्यांच्या शब्दांची अशीच भुरळ पडून मोदी, फडणवीस व पाटील लाटीचे लोण काँग्रेस वटवृक्षाची मुळे रुजलेल्या गावा-गावातपर्यंत कधीच पोहोचले हे कळलेही नाही. अस्सल काँग्रेस मतदार असलेल्या ग्रामीण भागातही शहरी भाजपवाले पोहोचल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. नोटाबंदीचे अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेले अपयश अद्याप तरी लोकांना दिसत नसल्याचेच निकालाचे आकडे सांगतात. ज्यावर काँग्रेसचा शाब्दिक प्रचारजोर होता.