शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 8:59 PM

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. उपचाराअभावी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ईएसआय प्रशासनातर्फे कामगार रुग्णांसाठी पंढरपुरात ईएसआयसीचे मॉडेल डिस्पेन्सरी उभारले आहे. रुग्णालयाच्या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करुन २०१२-१३ मध्ये इमारत बांधण्यात आली. तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते २०१५ मध्ये थाटात रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरु झाल्यानंतर अवघ्या एक-दोन वर्षात इमारतीच्या भिंतीच्या तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले. तरीही इमारतीची पडझड अजून सुरुच आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन रुम व ड्रेसिंग रुम मधील सिलींग कोसळले.

ही घटना प्रशासनाने दाबून ठेवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगळवारी काही सुज्ञ कामगारांमुळे ही घटना उघडकीस आली. दोन्ही खोल्यांमधील भिंत कोसळून भिंतीचे सिमेंट गट्टू सिलिंगवर पडल्याने सिलिंगचा काही भाग तुटला आहे. अजूनही कोसळलेले गट्टू सिलिंगवर तसेच पडलेले असून, कोणत्याही क्षणी सिलिंगचा भाग तुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देवून उपचार केले जातात.

त्यामुळे रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथील अग्निशमन यंत्रणा धूळ खात असून, लिफ्टही कायम बंद असते. या भागात विजेचा लपंडाव सुरु असतो. जनरेटरही बंदावस्थेच असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन बांधलेल्या इमारतीला अवघ्या पाच वर्षांतच उतरती कळा लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विषयी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. व्यंकट यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी कोसळलेल्या भिंतीविषयी वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगितले.इमारतीच्या कामाची तपासणी करावी ..निकृष्ट दर्जाचे बांधकाम काम केल्यामुळेच इमारतीला उतरती कळा लागली आहे. इमारतीच्या कामाची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी ईएसआय कामगार संघटनेचे प्रकाश जाधव यांनी केली आहे.कामगार रुग्णाच्या जिविताला धोका ..या रुग्णालयात दररोज जवळपास ६०० कामगार रुग्ण येतात. अल्पावधीतच इमारतीची दुरावस्था झाली असून, नुकतीच भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचे संतोष दळवी यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद