महावितरणला फटका : दुष्काळाचा परिणाम ग्राहक संख्येवरबीड : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. सर्रास जिनिंग उद्योग बंद झाल्याने उच्चदाब ग्राहकांनी कनेक्शन कायमस्वरूपी, तर काहींनी तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. वर्षभरात १६ ग्राहकांनी उच्चदाब वाहिनीवरील वीज जोडणी बंद केली आहे.बीड विभागात कृषीपंप व घरगुती ग्राहकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही विभागातील ग्राहकांपेक्षा औद्योगिक ग्राहकांची वसुली चोख असल्याने त्याचा फायदा विभागाला होतो; मात्र दिवसेंदिवस खालावत चालेली ग्राहकांची संख्या विभागाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. २०१४-१५ साली उच्चदाब ग्राहकांची संख्या १८२ ऐवढी होती. त्यापैकी १६ ग्राहकांनी कायमची वीजजोडणी बंद केली आहे, तर ४० ग्राहक फक्त हंगामात वीजजोडणी करीत असल्याने महिन्याकाठच्या वसुलीत मोठी तफावत झाली आहे. १०० के.व्ही.पेक्षा अधिक भार असलेल्या जिनिंग, आॅईल मिल, साखर कारखाने, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या उच्चदाब वाहिनीवर आहेत. यंदा केवळ चार स्टोन क्रशरच्या ग्राहकांनी उच्चदाब वाहिनीवर कनेक्शन घेतले आहेत. वर्षाकाठी ग्राहकांनी व्यवसायाचा हंगामाचा कालावधी महावितरण कार्यालयाकडे सुपुर्द केल्यास त्या कालावधीमधील बिले अदा करणे हे ग्राहकांवर बंधनकारक असते. त्यामुळे महिन्याकाठी कमीत कमी ११ हजार रुपयांचे बिल भरावे लागते. या भीतीपोटी ग्राहकांची संख्या कमी होत आहे. दरवर्षी मार्च- एप्रिल महिन्यात उच्चदाब ग्राहकांनी हंगाम कालावधी महावितरणकडे देणे आवश्यक असते. त्यानुसार हंगामाचा कालावधी वाढला तरी नियमित महिन्याकाठचे बिल ग्राहकांना भरावे लागते. (प्रतिनिधी)उपाय : या तरतुदींचा ग्राहकांना फायदाठरवून दिलेल्या हंगाम कालावधीपेक्षा कमी कालावधी भरला तर ग्राहकांना विनाकारण अधिकचे बील अदा करावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी कमी कालावधीच तर फायद्याचे राहील.सध्या ही प्रक्रीया महावितरण कार्यालयात सूरु असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे अवाहन उपकार्यकारी अभियंता पी.एम. राख यांनी केले.
‘उच्चदाब’ ग्राहकांमध्ये घट
By admin | Published: May 03, 2016 11:58 PM