पैठण : औरंगाबाद जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. २१ डिसेंबरअखेर जिल्ह्यात ७३८६९६.२३ मे. टन उसाचे गाळप झाले असून, गाळपातून ५७७२२५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपात साखरेचा उतारा अद्यापही ७.८१ टक्के इतकाच राहिला आहे. आमदार हरिभाऊ बागडे यांच्या संभाजीराजे साखर कारखान्याचा सर्वाधिक ८.६७ टक्के तर राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी म्हणजे ५.१६ टक्के इतका आला आहे. साखर उतारा कमी आल्याने कारखान्याचे आर्थिक गणित अडचणीत आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण, शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा, कन्नड येथील बारामती अँग्रो, राजे संभाजी, मुक्तेश्वर व घृष्णेश्वर या सहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम साधारणपणे नोहेंबर व डिसेंबर दरम्यान सुरू झाले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत साखर उतारा सरासरी १० टक्क्यांपेक्षा जास्त अपेक्षित आहे
चौकट
२१ डिसेंबरअखेर
जिल्ह्यातील कारखान्यांंचा उतारा
संत एकनाथ - ७.४६ टक्के, शरद सहकारी - ५.१६ टक्के, कन्नड बारामती अँग्रो - ८.१ टक्के, राजे संभाजी - ८.६७ टक्के, मुक्तेश्वर - ८.४५ टक्के व घृष्णेश्वरचा ७.३७ टक्के इतका उतारा आलेला आहे.
चौकट
पैठण तालुक्यातील कारखान्यात साखर उताऱ्यात मोठे अंतर
पैठण तालुक्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन घायाळ शुगर कंपनीच्या वतीने चालविला जात आहे. या कारखान्याचा साखर उतारा ७.४६ टक्के निघाला आहे. दुसरीकडे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा अवघा ५.१६ टक्के आला आहे.